उरण दि 12(विठ्ठल ममताबादे ) : उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या व पनवेल शहराच्या शेजारी वसलेल्या करंजाडे शहरांमध्ये विविध नागरी समस्या भेडसावत आहेत. यामध्ये विशेषतः पाणी प्रश्न, रस्ते व गटारे आशा विविध समस्या बाबत नागरिक खूप त्रस्त आहेत.दिनांक 11 जुलै 2023 रोजी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार महानोरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या शिष्टमंडळाने करंजाडे नोड मधील पाणी, गटारे व रस्ते या नागरी समस्या बाबत मुख्य कार्यकारी अभियंता वॉटर सप्लाय श्री.एस ई मूल व मुख्य कार्यकारी अभियंता रस्ते विभाग या दोघांशी चर्चा करून येत्या दहा दिवसात पाणी सुरळीत चालू होईल व रस्त्यांचे काम चालू होईल अशा दोन्ही विषयी सकारात्मक चर्चा केली.
या शिष्टमंडळात करंजाडे नोडचे शिवसेना शहरप्रमुख गौरवदादा गायकवाड,लांजा तालुका सहसंपर्कप्रमुख गोपाळ रमेश आगरे, युवासेना करंजाडे शहर आधिकरी, निखिल भोपी, सेक्टर 4 चे शाखाप्रमुख गणपत आंबेकर, प्रभागप्रमुख सेक्टर ५/६ वसंत सोनवणे यांचा समावेश होता.