उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )
नमो वृक्षेभ्यः ! यथेयं पृथिवी देव भुतान गर्भे दधाति वै ! तथेयं वृक्षक दध्यात त्वा तस्यावसे हृदये !! अर्थात वृक्षासं नमस्कार असो. पृथ्वीवरील सर्व सजीवांप्रमाणेच वृक्ष सुद्धा पृथ्वीची संतती आहे . हे परमेश्वरा,ह्या रोपट्यांचे रक्षण करण्यासाठी तू सहाय्य कर !.
निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे त्याच्या कुशीत सामावलेल्या सर्व साधन – संपत्तीचं जतण आणि संरक्षण करणं हे प्रत्येक मानवाचं आद्य कर्तव्य आहे आणि ह्याच कर्तव्याप्रति प्रामाणिक राहण्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याकरिता वन्यजीवांच्या संरक्षणाकरिता , संवर्धनाकरिता ०१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. आणि ह्याच निमित्ताने ठाणे वनविभाग, कर्नाळा पक्षी अभयारण्य, उरण वनविभाग आणि कर्जत पूर्व वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्त उरण – पनवेल,कर्जत तालुक्यातील शाळांत आणि विविध आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवामध्ये ह्या जंगल संपत्ती बद्दल वन्यजीवांप्रति जनजागृती निर्माण व्हावी या करिता एकूण सात दिवस वेगवेगळ्या सात आदिवासी वाड्यांवर आदिवासी बांधवांचीं आणि विद्यार्थी वर्गाची जनजागृती व्हावी व त्या माध्यमातून वन्यजीवांचे व जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावं या करिता राजू मुंबईकर यांच्यां साप समज आणि गैरसमज व विविध प्राणी आणि पक्षी या बद्दलची उपयुक्त माहिती देणारे व्याख्यानरुपी प्रबोधनात्मककार्यक्रमा द्वारे जनजागृती करण्यात आली. पहिल्या दिवशी पनवेल आपटा येथील प्राथमिक शाळेत आपटा गावाच्या सरपंच नाजनिन पटेल,मारुती चव्हाण (ग्रा.पं.सदस्य) ,धुमाळ आणि शाळेतील विद्यार्थी वर्ग व शिक्षक वृंद यांच्या उपस्थित तर दुसऱ्या दिवशी पोसरी ठाकूरवाडी पनवेल येथे सरपंच सुनिताताई सिद व माजी सरपंच बाबुराव सिद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तर तिसऱ्या दिवशी अक्कुलवाडी येथील प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थीवर्ग आणि शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत तर चौथ्या दिवशी पी.पी.खारपाटील इंग्लिश मिडियम स्कूल चिरनेर येथे शाळेतील संचालक मंडळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत तर पाचव्या दिवशी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वि येथील शाळेतील विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत,सहाव्या दिवशी रानसई प्राथमिक शाळा येथे शाळेतील शिक्षिका कडू मॅडम,शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी वर्ग व आदिवासी बांधव यांच्या उपस्थितीत, सातव्या दिवशी कर्जत पूर्व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रमाद्वारे सर्व विद्यार्थी वर्गाला आणि सर्व आदिवासी बांधवाना ह्या निसर्गातील जैवविविधता आणि ह्याच जंगलातून मिळणाऱ्या साधन सामुग्रीचं जतण करणे आणि ह्या जंगलात वास्तव्यास असणाऱ्या अनेक वन्यजीवांप्रति आस्था निर्माण व्हावी व त्या प्रेरणेतून या जीवांचे संरक्षण व्हावं ! या दृष्टी कोणातून त्यांच्या जनजागृती व्हावी यासाठी
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा ( वन्यजीव )- एन.डी.राठोड आणि महाराष्ट्र भूषण केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी या कार्यक्रमात आदिवासी बांधवाना मार्गदर्शन केले.संबोधित करतांना राठोड यांनी सांगितले की जंगलातील प्राणी, पक्षी आणि जैवविविधता यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याकरिता वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जोडीला आपण आदिवासी बांधवांनी सुद्धा योगदान दिले पाहिजे जंगलातील संपत्तीला वाचविण्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्नशील राहील पाहिजे असं उपस्थित सर्वांना आवाहन देखील केलं.त्याच सोबत वन्यजीव प्रेमी राजू मुंबईकर यांनी शाळेत आणि प्रत्येक वाडीवर आदिवासी बांधवाना मार्गदर्शन करताना सापांबद्दल समाज्यात असणारे समज आणि गैरसमज याच्या बद्दल माहिती दिली. त्याच सोबत टी.व्ही. स्क्रीन वर प्रत्यक्ष त्या सापांची चित्र दाखवत त्यात विषारी आणि बिनविषारी सापांची उपयुक्त माहिती दिली सोबतच अनेक प्राणी पक्षी यांच्या बद्दलची माहिती देताना लुप्त होत चाललेल्या प्राणी पक्षांचं रक्षण आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे हे समजावून सांगितलं सोबतच त्यांच्या आजूबाजीलाच असणाऱ्या विविध पक्षी, प्राण्यांची माहिती देत सर्व शालेय विद्यार्थ्यांची आणि त्या आदिवासी बांधवाची उत्सुकता वाढविली.
वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित सात दिवसांचा हा जनजागृती कार्यक्रम कर्जत पूर्व प्राथमिक शाळा,आपटा प्राथमिक शाळा, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वि, पी.पी.खारपाटील इंग्लिश मिडियम स्कूल चिरनेर, रानसई प्राथमिक शाळा,अक्कुलवाडी आदिवासीवाडी, पोसरी आदिवासीवाडी या सर्व ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमा दरम्यान प्रत्येक आदिवासी वाडीवरील लहान चिमुकल्यानां खास गोड खाऊंचं ( बिस्किटांच्यां पाकिटांचे ) वाटप सुद्धा करण्यात आले. वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित ह्या कार्यक्रमा करिता प्रमुख मान्यवर महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर(वैधानिक पद सदस्य कर्नाळा अभयारण्य) यांनी आपल्या साप समज आणि गैरसमज ह्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे सर्व शालेय विद्यार्थी वर्गाचे आणि आदिवासी बांधवांचे प्रबोधन केले. ह्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक एन.डी.राठोड( वनपरीक्षेत्र अधिकारी कर्नाळा वन्यजीव ),प्रदीप चव्हाण(वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत पूर्व ),व्ही.एम.म्हात्रे (उरण वनविभाग अधिकारी),एम.बी.इंगोले(उरण वनविभाग), एन.टी.भिषे(उरण वनविभाग),राजेंद्र पवार ( उरण वनविभाग)शितल पाटील (उरण वनविभाग),सुप्रिया कसबे ( उरण वनविभाग ), कर्नाळा पक्षी अभयारण्य वन विभागातील अधिकारी वर्ग एस.एस.पवार(वनपाल आपटा),तुकाराम जाधव ( वनरक्षक ), भुपेंद्र वारगे (वनरक्षक )आणि अनिल घरत( उरण तालुका सचिव – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था )आणि शालेय विद्यार्थी आणि आदिवासी वाड्यांवरील सर्व आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत वन्यजीव सप्ताहाचा हा सुंदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.