कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकररावजी काळे यांना फक्त समाजाची काळजी होती. त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते. समाजाची निष्काम सेवा एवढेच त्याचे ध्येय होते. संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते तेवढ्याच योग्यतेचे त्यांचे समाजासाठी योगदान असल्याचे गौरोवोदगार ह.भ.प. पुरोषोत्तम महाराज पाटील चिखलीकर यांनी काढले.
शिक्षण,सहकार,कृषी,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा अजोड ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ह.भ.प. पुरोषोत्तम महाराज पाटील चिखलीकर बोलत होते.
शिंदे,आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे, अॅड. प्रमोद जगताप,कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, बबनराव कोळपे, चंद्रशेखर कुलकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, वसंतराव आभाळे, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, तसेच बाबासाहेब कोते, सतिश कृष्णानी, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे, बाबुराव कोल्हे, संभाजीराव काळे, राजेंद्र गिरमे, अशोक काळे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव देवकर, रामदास केकाण,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी सुनील कोल्हे, आसवनी विभगाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य,संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.