उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे ज्युनियर कॉलेजमध्ये रायगडभूषण जेष्ठ साहित्यिक प्रा.एल.बी.पाटील यांच्या अध्यक्षते खाली कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप)उरणच्या कवींचे रंगतदार कविसंमेलन संपन्न झाले.प्राचार्य सुभाष ठाकूर यांनी उत्कृष्ट असे प्रास्ताविक केले.आपल्या रंगतदार वाणीने सूत्रसंचालन करून प्रा.शरद केणी यांनी कविसंमेलन अतिशय छान खुलविले.मच्छिंद्र म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे यांच्या आगरी बोलीतील विनोदी कवितांनी विद्यार्थ्यांना भरपूर हासविले.भगवान.पो.म्हात्रे, संजय होळकर, अरुण म्हात्रे यांनी गुरूचे संस्कार आणि विकासात्मक ध्यास यावर कवितांचे वाचन केले.नववीच्या उपासना गावंड विद्यार्थीनीने मुलामुलीच्या वागन्यावर विनोदी शैलीत गाऊन कविता सादर केली.उरणातील सुमधुर आवाज असलेले सुजीत डाकि यांनी प्रेम या विषयावर कविता गाऊन तरुणाईला आनंदी केले.इवान आणि मामा लय मोठा या विनोदी दोन कविता सादर करून भरपूर दाद मिळविली.अशा प्रकारे रामचंद्र म्हात्रे जुनिअर कॉलेज मध्ये कवी संमेलन मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.