काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली नामफलकाचे अनावरण.

0

उरण  दि १९ ( विठ्ठल ममताबादे ); भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गाव तेथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी अंगीकारला असून त्याची सुरुवात ही दिघोडे गावातून केली.गावा गावात काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवारी ( दि१८) या संकल्पेचा दुसरा टप्पा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी भेंडखळ गावातील गाव तेथे काँग्रेस या नामफलक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून मोठ्या धुमधडाक्यात पुन्हा एकदा सुरू केला आहे.

   

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याचे काम केले आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य माणसाच्या हृदयात घर करून  आहे.हे गाव तेथे काँग्रेस या नामफलक अनावरण प्रसंगी पाहायला मिळत आहे.प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांनी भूमीपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा उभारला.अशा प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ असलेल्या लोकनेते दि.बा.पाटलांच नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळून देने हे काँग्रेस बरोबर या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे काम आहे.आज जेएनपीएचा फंड उरण तालुक्यातील गावांना मिळत नाही ही शोकांतिका आहे.गोपाळ पाटील यांनी उरणचा आमदार निवडून यावा म्हणून पुढाकार घेतला.परंतु उरण करांचे प्रश्न जैसे थे थितीत प्रलंबित राहिले.असे शेवटी महेंद्र शेठ घरत यांनी नमूद करून जनमानसांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेवटी स्पष्ट केले.

 

गाव तेथे काँग्रेस या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील भेंडखळ,नवघर, पागोटे, जसखार, सोनारी,करळ,फुंडे,पाणजे,डोंगरी,बोकडविरा,नवीन शेवा,द्रोणागिरी नोड सह इतर महालण विभागातील गावात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा रायगड प्रभारी श्रीरंग बरगे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले.या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य मिलिंद पाडगावकर,जे.डी.जोशी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, उरण तालुका युवक अध्यक्ष लंकेश ठाकूर,माजी शहराध्यक्ष किरिट पाटील,श्रीयश घरत,विधणे विभाग अध्यक्ष बी एन ठाकूर, काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अश्विन कैलास थळी, महिला अध्यक्षा रेखा घरत,इंटक जिल्हा उपाध्यक्षा विनया पाटील, वैभव पाटील, नरेश कडू, ध्रुव जयवंत पाटील,साहिल पाटील, तेजस तांडेल, एकनाथ घरत, प्रेमनाथ ठाकूर,रोहित घरत, काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष घनश्याम पाटील, राजेंद्र भगत,वैभव पाटील,किरण कुंभार सह काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार घनश्याम कडू यांनी उरण करांसाठी  रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची महेंद्र शेठ घरत यांच्या कडे मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here