पैठण,दिं.२४:कातपूर परीसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागेला मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी विठ्ठल दोरखे, अतुल मोरे, हरिश्चंद्र थोडी, अशोक गोगडे, गोकुळ रावस, डॉ संजय गंगवाल, एकनाथ वीर सह शेतकऱ्यांनी केली आहे.
कातपूर परीसरात मोठ्या प्रमाणावर मोसंबी बागा असून शेतकऱ्यांनी कसेबसे मोसंबीला जिवापाड जपून तीला वाढविले परंतु मागे झालेल्या अतिवृष्टीमुळे या बागाना मोठा फटका बसला असून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून मोसंबीची फळगळ सुरू आहे या परीसरातील शेतकऱ्यांची कापुस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोसंबी सुध्दा संकटात आहे सध्या मोसंबी काढणीला आलेली असुन फळगळीमुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.