पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी): कातपूर येथील श्री संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या ११३ व्या पुण्यतिथी निमित्ताने सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
पैठण तालुक्यातील कातपूर येथे श्री गजानन महाराज यांचे एकमेव मंदिर असल्याने ऋषी पंचमी निमित्ताने व श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने श्री च्या मूर्तीस सकाळी ब्रम्ह मूहूर्तावर रूद्र अभिषेक वे.शा.सं.प्रशांत कुलकर्णी यांनी पुरोहित केले याप्रसंगी हभप रामचंद्र महाराज चिंचोलकर, पत्रकार मदन आव्हाड,पिंपळवाडीचे उपसरपंच दादासाहेब गलांडे, संजय दिलवाले, संतोष वीर, विजय चव्हाण, नारायण सटाळे, बाळासाहेब आढाव, एकनाथ मोरे नाना,माजी सरपंच भाऊसाहेब मोरे,शुभम रोडी, संजय आढाव,राम सटाले,शरद खुरपे, एकनाथ वीर,भरत काळे, भाऊसाहेब औटे,दशरथ सोनवणे,नंदू जोशी,पुनमचंद शिंदे, गजेंद्र आढाव,भारत आढाव, विनायक मोकासे, शिवाजी साटोटे, सचिन चव्हाण, विजय लोहिया, विठ्ठल केसकर, विश्वनाथ धोंडगे, सोमवंशी,मोहन सोलाट, रामचंद्र पानपट, अनिल आढाव, अनिल जाधव सह पैठण तालुक्यातील श्री गजानन महाराज भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांना रामभाऊ सटाले यांनी महाप्रसाद दिला.