कापूस चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी केली जेरबंद

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

            राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली असून ६ आरोपींसह टेंपो  व अलिशान कार पोलिसांनीताब्यात घेतली असून माञ दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. देवळाली प्रवरा येथील अतुल नानासाहेब कदम यांच्या शिवतेज कापूस खरेदी केंद्रातून तर तेजस कदम यांच्या साईतेज कापूस खरेदी केंद्रातून ८० हजार ५०० रुपये किंमतीचा कापूस चोरी गेल्या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

          राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी या चोरीच्या तपासाची चक्रे फिरवून अवघ्या २४ तासाच्या आत ६ आरोपी टेंपो व अलिशान कारसह पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. सराईत गुन्हेगारी करणारा करण माळी याने कापुस चोरी करण्यासाठीं टोळी बनवली होती.या टोळी मध्ये पप्पू गुलाब बर्डे, ऋषिकेश मधुकर लोखंडे वय २१ वर्ष, प्रज्वल सूर्यभान झावरे वय २० वर्ष, प्रज्वल अशोक भांड वय १९ वर्षे, विनीत संजय कोकाटे वय १८ वर्ष,अक्षय नारद, बन्नी बर्डे, प्रतीक बाळासाहेब बर्डे वय २१ वर्षे, सचिन रमेश बर्डे उर्फ टीचकुले वय २१ वर्षे अशा दहा जणांची टोळी तयार केली होती.या टोळीने तालुक्यात कापुस चोरीचा धडाका लावला होता.

कापुस चौरीच्या गुन्ह्यात प्रज्वल झावरे,ऋषिकेश लोखंडे,प्रज्वल भांड,विनीत कोकाटे,प्रतीक बर्डे, सचिन बर्डे उर्फ टीचकुले यास शीताफीने ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी छपा टाकला त्यावेळी  करण माळी व पप्पु बर्डे हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. या टोळी कडून कापुस चोरण्यासाठी वापरला गेलेला टाटा एस (क्रमांक एम एच ४४- ८३८२) व ईनोव्हा गाडी (क्रमांक एम एच ०१-एसी-४२७१) हि वाहने ताब्यात घेतली आहे.

                   पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज गायकवाड, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल सम्राट गायकवाड यांनी केली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कापुस चोरीच्या गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग आसेल तर तालुक्यातील कापुस चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here