उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे )ज्येष्ठ कामगार नेते स्वर्गीय शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित एकता कॅटलीस्ट, कोकण श्रमिक संघ आणि आगरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी आदय क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत ‘स्वर संगीत शाम’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजित कार्यक्रमात कामगार नेते दिवंगत शाम म्हात्रे यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी, कामगार वर्ग, प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कामगार नेत्या श्रृती शाम म्हात्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9769518399 या क्रमांकावर संपर्क साधावे.