वीरगो डिस्टिक पार्क मुंबादेवी एंटरप्रायजेसच्या कामगारांना ६ हजारांची भरघोस पगारवाढ.
उरण दि ४(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील अनेक गोदामामधील कामगारांना आपलेसे वाटणारे कामगार नेते रवी घरत यांच्या द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगारांचे वेतनवाढ करण्याचा धडाका सुरूच असल्याचा प्रत्यय आज पुन्हा आला त्यांनी आहे. खोपटे येथील वीरगो डिस्टिक पार्क मुंबादेवी एंटरप्रायजेसच्या कामगारांना तब्बल ६ हजार रुपायांची पगारवाढ मिळवून दिली आहे.
उरण तालुक्यात कंटेनर गोदामांचा व्यवसाय गेल्या काही वर्षात अगदी वाऱ्याच्या वेगाने वाढला आहे . अशी सरकारी आणि खाजगी गोदामे बहुतांशी ठिकाणी ठेकेदारांच्या माध्यमातून चालविली जात आहेत . अशी गोदामे चालविणारे ठेकेदार अनेकदा आपली मनमानी देखील करीत आहेत. मात्र कामगारांचे प्रश्न आणि ते सोडविण्याची धमक असलेले कामगार नेते रवी घरत यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या मुळे व्यवस्थापनांना नमते घेऊन कामगारांचे वेतन करार करावे लागत आहेत. त्याचाच प्रत्यय वीरगो डिस्ट्रिक पार्कच्या कामगारांना आला आहे. या कामगारांना तब्बल सहा हजारांच्या पगार वाढीसह या करारानुसार मेडिकल पॉलिसी , सुरक्षिततेची उपकरणे , हक्काच्या रजा , बोनसच्या रूपात एक पगार , आणि प्रत्येक वर्षाला पगारात वाढ करण्याचे या निमित्ताने मान्य करण्यात आले आहे.
या कराराबाबत बोलतांना कामगार प्रतिनिधी अतिश भगत यांनी सांगितले की कामगार नेते रवी घरत यांनी अशक्य त्या गोष्टी शक्य करून दाखविल्या असून त्यांच्यावर आम्ही कामगारांनी टाकलेला विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ केल्याचे या निमिताने सांगितले आहे. कायद्यांच्या योग्य अभ्यासाने कंपनी प्रशासनाला कामगारांच्या वेतन करार करायला भाग पाडण्याची किमया ते करीत आहेत हे कामगारांसाठी अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले . यावेळी कॉन्ट्रॅक्टर योगेश पाटील ,उपाधक्ष निशांत ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.हा करार कामगार आयुक्त कार्यालयात कुलकर्णी मॅडम यांच्या दालनात करण्यात आला