पैठण,दिं.२४(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील कारकीन येथे शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्ताने श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळयाची गावातून रथात श्रीमद भागवत ग्रंथाची मिरवणूक काढून करण्यात आली.
कारकीन ता.पैठण येथे शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्ताने श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा निमित्ताने मंगळावर रोजी गावातून आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी घरासमोर महिलांनी सकाळी सडा रांगोळी काढून श्रीमद भागवत ग्रंथाची पुजा करुन दर्शन घेतले.
मिरवणूक राधाकृष्ण लाॅन्स येथे आल्यावर या उत्सवाची सांगता हभप भागवताचार्य विष्णुजी महाराज देशमुख यांचे काल्याचे किर्तन झाली यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना सांगितले की,सर्व श्रीमद भागवत हा राष्ट्रीय ग्रंथ असून या ग्रथांतुन ज्ञानप्राप्तीचे संस्कार घडतात त्यामुळे श्रीमद भागवत ग्रंथाचे वेळोवेळी वाचन करावे व वेळोवेळी होणा-या भागवत कथेचे श्रवण करावे भगवान श्रीकृष्णाची जीवनगाथा अन्याया विरूद्ध लढण्याची प्रेरणा देते हे विसरून चालणार नाही असेही देशमुख महाराज म्हणाले.देशमुख महाराजांनी श्रीमद संगीत भागवत कथेचे आयोजक बद्रीनाथ लिपाने पाटील यांच्या नशिबी व पूर्व पुण्याईमुळे तुम्हाला दरवर्षी श्रीमद भागवत कथेचा लाभ मिळतो त्यांचे हे धर्मकार्य तुम्हाला मार्गदर्शक करणारे आहे यांची आपण जाणीव ठेवावी व त्यांच्या धर्मकार्याला सदैव पाठींबा देत राहिला असेही ते म्हणाले.लिपाने परीवार यांच्या या धर्मकार्यामुळे आम्हाला श्रीमद भागवत कथा ऐकण्याचे भाग्य लाभले असे यावेळी उपस्थित भक्तांनी सांगितले.
यावेळी बद्रीनाथ लिपाने पाटील, आण्णासाहेब गुंजाळ, जगन्नाथ वैद्य,कडूबाळ लिपाने, कृष्णा लिपाने, आकाश लिपाने, गणेश गुंजाळ, विष्णू गुंजाळ, हभप जालिंदर मुळे,हभप आन्नसाहेब नवले,हभप राऊत सह पंचक्रोशीतील भाविकासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.