उरण दि ३(विठ्ठल ममताबादे) : एखाद्या व्यक्तीच्या मनात समाजकार्य करायची जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर समाज्यात अशी अनेक माध्यमं आहेत कीं त्या माधायमातून आपण कोणतंही समाजकार्य करू शकतो !.आणि ह्याच प्रबळ ईच्छाशक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय आज पाहायला मिळाला तो एका भावाने आपल्या स्वर्गीय भावाच्या जन्मदिनाचं औचित्य साधत एक प्रेरणादायी समाजकार्य करत समाज्यापुढे एक आदर्श निर्माण केला ! तो म्हणजे आपल्या स्वर्गीय भावाच्या म्हणजेच स्वर्गीय कु.अमितदादा पालकर त्यांच्या पवित्र आठवणींचा सुगंध सदैव त्यांच्या अविरत कार्यातून दरवळत राहावा याच उदात्त भावनेतून त्यांचे बंधूराज अमोघदादा पालकर पुतणी कु.दुर्वा पालकर आणि बिग बॉस ग्रुप वेश्वी उरण यांच्या माध्यमातून एक प्रेरणादायी कार्य साकारण्यात आले ते म्हणजे सलग दहाव्या वर्षी रा.जि.प.शाळा वेश्वी येथील १५० विद्यार्थ्यानां आणि वेश्वी आदिवासीवाडी येथील शाळेतील ५० विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. त्यातूनच त्या विद्यार्थ्यांकरिता दिलेला मदतीचा हात त्यांना खूप मोलाचं ठरेल त्यातूनच त्यांच्या शालेय अभ्यासात प्रगती होण्याकरिता मदत होईल तेवढं मात्र नक्की ! सोबतच नेरे – भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रमातील आजी- आजोबांना स्वादिष्ट असं जेवणं देऊन अन्नदानाचं पुण्यकर्म करून त्या निरागस निर्मल आजी – आजोबांचे आशीर्वाद त्यांच्या पुढील आयुष्यात कामी येतील.आणि हे सर्व पाहता अमोघदादा पालकर यांनी आपल्या भावाच्या म्हणजेच कै.कु.अमितदादा पालकर यांच्या आठवणींच्यां स्मृती सामाजिक कार्याच्या माध्यमातून अखंड तेवत ठेवल्या आहेत.
रा.जि.प.शाळा वेश्वी वेश्वी आदिवासीवाडी शाळा आणि नेरे – भानघर करूणेश्वर वृध्दाश्रम येथे साकारलेल्या ह्या प्रेरणादायी कार्यक्रम प्रसंगी स्वर्गीय कु.अमितदादा पालकर यांचे बंधुराज अमोघदादा पालकर, कैलासदादा पालकर,महेशदादा पालकर,शरददादा पालकर, सोबतच बिग बॉस ग्रुपचे अक्षय पाटील, नितेश मुंबईकर, राकेश पाटील, प्रणित कडू,परम पाटील, कल्पेश पाटील, रोशन पाटील केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर , केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.सोबतच करूणेश्वर वृध्दाश्रमातील करुणाताई ढोरे,ईश्वरदादा ढोरे,वेश्वी शाळेतील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थीवर्ग यांच्या उपस्थितीत हा सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.