कॉम्रेड गोंविद पानसरे यांच्या तपासावरून उच्चन्यायालयाने एटीएसला झापले

0

 मुंबई : कॉम्रेड गोंविद पानसरे (Combred Govind Pansare) यांच्या हत्येच्या खटल्याची प्रगती सांगण्यापेक्षा तपासात काय प्रगती केलीत हे दाखवा, असे खडेबोल मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) गुरुवार 21 डिसेंबर रोजी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) सुनावलेत. एटीएसच्या संथ कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी सादर केलेला अहवालही गुरूवारी हायकोर्टानं दाखल करुन घेण्यास स्पष्ट नकार दिला. याप्रकरणी नव्यानं तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्यास हायकोर्टानं एटीएसला तीन महिन्यांची मुदत देत सुनावणी तहकूब केली.

या खटल्यात आतापर्यंत 17 साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी हायकोर्टाला दिली. यावर आम्हाला खटल्यापेक्षा तपासाची प्रगती जाणून घ्यायची आहे, असं मत न्यायालयानं नोंदवलं. 

20 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे यांची कोल्हापूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचा तपास सीआयडी करत होती. हा तपास योग्य पद्धतीनं होत नसून याचा तपास एटीएसकडे द्यावा, अशी मागणी करणारी याचिका पानसरे यांची सून स्मिता पानसरे यांनी हायकोर्टात केली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं या कसेचा तपास एटीएसकडे सोपवला असून या तपासावर न्यायालयाची नियमित देखरेख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here