उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने “रोल ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड मॅनेजमेंट इन असेलरेटिंग क्रिएटिव्ह इकॉनोमी” ( वाणिज्य, उद्योग व व्यवस्थापनातील अर्थव्यवस्था निर्माण गतीची भूमिका) या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेसाठी देशातल्या विविध राज्यातून अनेक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवला. परिषदेचे प्रास्ताविक परिषदेचे संयोजक प्रा. व्हि. एस. इंदुलकर यांनी केले. स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए.शामा यांनी केले.
परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉ. सुरेश मैंद (अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा अध्यक्ष, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ , मुंबई विद्यापीठ) हे होते. तर बीजभाषक म्हणून डॉ. एच. के.सिंग ,(विभाग प्रमुख, कॉमर्स विभाग, वाराणसी, उत्तर प्रदेश)हे होते. त्यांनी विविध उदाहरणांच्या साह्याने देशाच्या आर्थिक धोरणाचे विश्लेषण केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पराग कारुलकर यांनी केले. तर आभार प्रा.रियाज पठाण यांनी व्यक्त केले. पहिल्या तांत्रिक सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉ.अयकपाम चानू (बोडोलँड विद्यापीठ, आसाम), ह्या उपस्थित होत्या. तर सत्राध्यक्ष म्हणून मा.विनायक राजे (प्राचार्य, के.बी कॉलेज,ठाणे) हे होते. या सत्रात एकूण १३ संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. विनिता तांडेल यांनी. तर आभार प्रा.पूजा गुप्ता यांनी व्यक्त केले. दुसऱ्या तांत्रिक सत्रात साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ.विकास गायकर (सी एच एम कॉलेज उल्हासनगर, सदस्य, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ) हे उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील नरवडे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) हे होते. या सत्रात देशाच्या विविध राज्यातील एकूण नऊ संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले.
पाहुण्यांचा परिचय डॉ. एम.जी. लोणे यांनी दिला तर आभार डॉ.एच.के. जगताप यांनी व्यक्त केले. तर दोन्ही सत्राचे सूत्रसंचालन प्रा.हन्नत शेख यांनी केले. समारोपीय सत्रात डॉ.ए.आर.चव्हाण यांनी परिषदेचे आढावा वाचन केले. प्राचार्य डॉ. पराग आजगावकर(एम. एन. कॉलेज विलेपार्ले, मुंबई) हे समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते.त्यांनी विषयाची प्रासंगिकता सविस्तरपणे मांडली. तर समारोप सत्रात प्राचार्य के.ए. शामा यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेचे सीईओ मा. श्री प्रदीपचंद्र शृंगारपुरे यांची विशेष उपस्थिती परिषदेत होती. प्रा.व्हि.एस. इंदुलकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. परिषदेची तांत्रिक जबाबदारी प्रा. रियाज पठाण सर,साई कदम यांनी सांभाळली तर आर्थिक बाजू टि.एन घ्यार यांनी साभाळली.परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा. ऐ आर चव्हाण, प्रा.एच के जगताप, प्रा पी आर कारुळकर व प्रा. व्ही एस इंदुलकर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.