शाहुवाडी : शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गो वरील जुळेवाडी खिंडीत गॅस टँकर पहाटे पाच वाजता पलटी झाला आहे. टँकर मधून गॅस गळती झाल्यामुळे बांबवडे ते मलकापूर रस्ता वाहतुकीस पोलीसांनी बंद करण्यात आला.
चालक जाऊल हक ( वय ३५ रा झारखंड ) हा टँकर क्रमांक ( के ए o१ ए एल ८३७९ ) रत्नागिरी येथून टँकर मध्ये गॅस भरून बेंगलोर कडे जात होता. टँकर जुळेवाडी खिंडीतील वळणावर पहाटे पाच वाजता पलटी झाला. या अपघातात चालक जाऊल हक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शाहूवाडी पोलीसांना समजताच कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गो वरील वहातुक बंद करण्यात आली.
कोल्हापूर कडे जाणारी वहातुक सरुड रोड मार्गे शिंपे तसेच कोकरूड पूला वरून रत्नागिरीकडे वळवण्यात आलेली आहे. सध्या बांबवडे ते मलकापूर हा रस्ता बांबवडे पासून पुढे मलकापूर पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. शाहूवाडी पोलीसांनी मलकापूर – बांबवडे येथे बंदोबस्त तैनात केला आहे. घटनास्थळी मलकापूर नगर पालिकेचा अग्निशामक बंब व १०८ अॅम्ब्यूलन्स सेवा तैनात केली आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे पोलीस कॉन्स्टेबल संतोष पांडव , सुयश पाटील आदी पोलीस कर्मचारी महामार्म वर गस्त घालीत आहेत.