इको फ्रेंडली शाडू मातीच्या गणरायाच्या मुर्त्या शोरूम मध्ये उपलब्ध..!!
नांदेड प्रतिनीधी
येथील तिरंगा चौक स्थित क्लासिक एन एक्स फॅशन या कपड्याच्या भव्य दालनात प्रेमचंदानी आणि कुटुंबियांच्या वतीने व राबविण्यात येणारा इको फ्रेंडली गणेश मूर्ती हा उपक्रम याही वर्षी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे
“मूर्ती आमची किंमत तुमची” या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना क्लासिक एन एक्स फॅशनच्या संचालिका सौ काव्या प्रेमचंदांनी यांनी सांगितले की शाडू मातीचे गणपती हे निसर्गाला धरून म्हणजेच इको फ्रेंडली असतात ज्यामुळे पर्यावरणाचाही रास होत नाही आणि धर्माचे ही पालन आपल्या हातून होत असते याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की आम्ही मागील अनेक वर्षापासून हा उपक्रम आमच्या क्लासिक एन एक्स फॅशन या दालनामध्ये राबवितो यासाठी लागणाऱ्या गणेश मूर्ती आम्ही यापूर्वी आंध्र प्रदेश येथून मागवायचं पण अलीकडच्या काळात आम्ही या मुर्त्या कलकत्ता येथून मागविल्या आहेत
त्याबरोबरच स्थानिक मूर्तिकारांनाही आम्हाला मुर्त्या उपलब्ध करून दिल्या शाडूच्या गणपती मुर्त्या बसविण्यामागे मुख्य हेतू आहे की आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी दहा दिवस मनोभावे त्यांची पूजाअर्चा करतो आणि अकराव्या दिवशी त्यांना सन्मानाने गंगेमध्ये विसर्जित करतो परंतु पीओपी पासून बनलेल्या गणेश मुर्त्या ह्या पाण्यामध्ये विरघळत नाहीत त्यामुळे त्या मुर्त्यांची विटंबना होते मग हे टाळण्यासाठी शाडू मातीचे गणपती मूर्ती हा निसर्ग व भक्ती यांचा उत्तम संगम येथे साध्य होतो.
कारण शाडूच्या मुर्त्या ह्या पाण्यामध्ये लगेच विरघळतात आणि आपण दहा दिवस गणपती बाप्पाच्या केलेल्या यथोचित सेवेचे फळ आपल्याला पंचतत्त्वातून प्राप्त होते हा उद्देश समोर ठेवून आम्ही हजारो गणेश भक्तांना शाडूच्या गणेश मुर्त्या पुरविण्याचे काम मागील अनेक वर्षापासून करीत आहोत असे त्या म्हणाल्या.. त्यासोबतच मागील ३०-४० वर्षा अगोदर गणेश मुर्त्या ह्या मातीच्याच असायच्या पण अलीकडच्या काळात पीओपीचा ट्रेण्ड या क्षेत्रात आला आहे जो की पर्यावरणाची त्याचबरोबर भक्ती भावाची हानी करत आहे..त्यासोबतच या शाडूच्या मुर्त्यांमधून मिळालेल्या रकमेचा वापर आपण गोशाळेला दान म्हणून करतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली..