क्लोजर रिपोर्ट ..

0

तपासयंत्रणा तत्परते

विश्वासठेवतात खुळे

पेटी बंद  रहस्ये सारी

मारून  टाकले खिळे

कुजलेले व्यवस्थापन 

ती दुर्गंधीसर्वत्र दर्वळे

आश्वासने तुडुंब मिळे

आशा दाखवी दरवेळे

थातूरमातूर अटक ती

चोरपुलिस खेळ खेळे

आधीचं जामीन  घेता

रे  मारून न्यायचे वेळे

जेरबंद चारपाच जण

आरोप दाखल  दुर्बळे

शृंखलाबध्द करुनिया

खात्यास बनवी दुबळे

नोंदी  करी अधिकारी 

केले काम हातावेगळे

बंदकरून केसेस सर्व 

मोकळे झाले रे सगळे

क्लोजर रिपोर्ट सादर

झाले ते नामा निराळे

चोळून हळू हळू डोळे

रे शांत होतीलं धुराळे

– हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996..

www.kavyakusum.com

अतिक्रमण.

गड किल्ल्यांजवळ

मातले अति क्रमण 

अमूल्य ठेव्याबाबत

नाआणे राजकारण 

वचक बसावा भला

कडक हवे ते धोरण

सक्तहव्या कारवाया 

नको ते दात कोरण

अमोलअद्भुतवारसा

पिढ्यांनादेई स्फुरण

ऐतिहासिक  दाखले

भविष्यांचे अनुसरण

फक्त न भग्नअवशेष 

ससादर मूक विवरण

हस्तक्षेम हिंसक असे

विदार्ण होअंतःकरण 

जनप्रबोधन जरुरीचे

त्वरे थांबवअधिगृहण

वेळीच थोपव कुवृत्ती

संस्कृतीस लाग ग्रहण

इतिहासघडवेभविष्य 

हवी कृतज्ञता  स्मरण

महापुरुषांचीआठवण 

भवितव्याची उध्दरण

चाणाक्षा साक्षात्कार 

महा  विभूतींचे चरण

आत्मघात  टाळू पहा

सदाचाराचे  आचरण

हेमंत  मुसरीफ, पुणे

  9730306996

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here