सूर उरणकरांचा ग्रुप तर्फे गिरीजा वेल्फेअर असोसिएशन खारघर येथील अनाथ आश्रमातील मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच मुलांना खाऊ व वस्तूंचे वाटप.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )“सुर उरणकरांचा” या ग्रुपच्या प्रमुख पूनम पाटेकर यांनी ‘खारघर येथील गिरिजा वेल्फेअर असोसिएशन अनाथ आश्रम मधील मुलांसाठी गाणी गाऊन त्यांचे मनोरंजन करू’ अशी संकल्पना मांडली आणि त्वरित ग्रुपमधील सदस्यांकडून आर्थिक तसेच वस्तू स्वरूपात मदतीचे हात पुढे आले. रविवार दिनांक 02/10/2022 रोजी दुपारी 4.00 ते 6.00 या दोन तासाच्या कालावधीत मुलांच्या आवडीची गाणी गायली त्याचप्रमाणे उपस्थित मुलांना देखील आपली कला दाखवण्याची संधी देऊन त्यांना प्रोत्साहित तसेच कौतुक केले. मुलांनी देखील सर्व सदस्यांसोबत गरबा खेळून खूप धमाल केली. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सर्व कलाकार भारावून गेले.
या ग्रुपमधील पूनम पाटेकर, गौरी मंत्री अनिता घरत, निमा भानुशाली, रंजना पाटील ,अनघा मात्रे ,सचिन वैद्य ,महेश घरत ,योगेश भस्मे, भरत शेळके, विनोद ठाकूर, दिनानाथ डांगे ,अंबरीश मात्रे, गणेश जाधव ,राजेश डांगे, उत्तम कुमार कडवे या सदस्यांनी उपस्थित राहून केलेल्या आर्थिक मदतीतून रुपये 10000/- रकमेचा चेक संस्थेच्या संस्थापिका सुमित्रा कुंजर यांच्या स्वाधीन केला .तसेच मुलांसाठी आणलेले सफरचंद आणि मिक्स ड्रायफ्रूट्स तसेच बिस्किट आणि फ्रुटी (स्पॉन्सर निखिल म्हात्रे) टॉवेल्स व चॉकलेट (स्पॉन्सर अरुणा नागवेकर) असे देण्यात आले. नवरात्रीच्या या शुभकाळात देवीने हे कार्य आम्हा सर्वांकडून करून घेऊन शुभाशीर्वाद दिले. असेच यापुढे आमच्याकडून उत्तम कार्य घडेल असे पूनम पाटेकर यांनी आशा व्यक्त केली आहे.