पैठण,दिं२. : खेर्डा ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत खेर्डा येथे माजी सैनिक सखाराम( दादा) शिंदे, बाबा पाटील शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय खेर्डाचे ग्रामस्थासह ग्रामपंचायत सदस्य बाबा पाटील शिंदे, रामेश्वर शिंदे , ग्रामसेवक तथा पैठण तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष खंडू वीर, ताराचंद शिंदे,तुकाराम शिंदे,संजय बुचूडे, चेअरमन नानु ,सखाराम दळे,सोमनाथ दळे, कृष्णा शिंदे,सुरेश लोखंडे,एकनाथ शिंदे,विलास लोखंडे,लक्ष्मण खंडागळे सह ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————-
फोटो : पैठण : खेर्डा ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.(छायाचित्र : विनायक मोकासे)