फलटण: ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 400/ 2021 भारतीय दंड विधानसहिता कलम 307 143,147,148, 149, 394 504, 506 या कलमान्वये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना गुंगारा देत गेल्या एक वर्षापासून फरारी होते फरारी आरोपी सांगवी गावात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती
गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर दबंग महिला पोलीस उपनिरीक्षक घोंगडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह माहिती मिळालेल्या ठिकाणाकडे धाव घेतली फरारी आरोपींनाही पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळू लागले परंतु
उपनिरीक्षक घोंगडे यांनी वेशांतर करून भर पावसामध्ये अंदाजे दोन किलोमीटर पर्यंत पाठलाग करून आरोपींना विश्वासात घेऊन ताब्यात घेतले यावेळी फरारी आरोपी कुमार धर्मा पवार अमोल धर्मा पवार राहणार आसू तालुका फलटण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सूचनेनुसार
फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एम बी भोसले पोलीस उपनिरीक्षक एस श.ए.घोंगडे साहेब पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस हवालदार हांगे पोलीस कॉन्स्टेबल निखिल गायकवाड या सर्वांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला