उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे ) श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त उरण तालुका मर्यादित रांगोळी व गड किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण रँकर्स अकॅडमी कोप्रोली चौक, कोप्रोली (उरण) येथे दिनांक 30/10/2022 रोजी 11:00 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नागरिकांच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांचे कला कौशल्य जनतेसमोर यावे व भारतीय संस्कृती टिकून राहावी या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रांगोळी व गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रांगोळी स्पर्धेत पहिल्या गटात (वयोगट 12 ते 21) प्रथम क्रमांक – सानिका म्हात्रे (कोपोली), द्वितीय – प्रेम घरत (खोपटे ), तृतीय- प्राची म्हात्रे (पाणदिवे )तर दुसरा वयोगट (22 ते पुढे )- प्रथम क्रमांक शुभम कोळी(दिघोडे ), द्वितीय- प्राजक्ता गोंधळी (चिरनेर),तृतीय – कांचन भोईर (मोठी जुई) तसेच गड किल्ले स्पर्धेत पहिला गट (वयोगट 6 ते 12) प्रथम क्रमांक – अर्चित पाटील (पागोटे ),द्वितीय – अंश ठाकूर (मोठे भोम), तृतीय -वीर जाधव (नविन शेवा), दुसरा गट (वयोगट 13 ते 20) मध्ये प्रथम क्रमांक -हिमांशु म्हात्रे (डोंगरी), द्वितीय – वेदांत विवेकानंद म्हात्रे (कोप्रोली ),तृतीय -वेदांत कामेश्वर म्हात्रे(आवरे ), तिसरा गट (वयोगट 21 पासून पूढे) या मध्ये प्रथम क्रमांक -निसर्ग म्हात्रे वशेणी, द्वितीय रंजीत सुशील ठाकूर (दिघोडे ) या स्पर्धकांनी विजय मिळविला. विजयी सर्व उमेदवारांना सन्मान चिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.व्यासपीठावर आदर्श शिक्षक मच्छिंद्र म्हात्रे, सल्लागार – सुधीर मुंबईकर, कुमार ठाकूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन नवनाथ म्हात्रे यांनी केले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, पदाधिकारी -प्रेम म्हात्रे, सुरज पवार,ओमकार म्हात्रे, साहिल म्हात्रे,हेमंत ठाकूर, शुभम ठाकूर ,प्रणित पाटील,आकाश पवार, नितेश पवार,सागर घरत,निकिता पाटील, सायली पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.