पैठण /गंगापूर : दिनांक ३/१०/२०२२ रोजी पोलीस ठाणे गंगापुर येथील स.पो.नि. साईनाथ गिते यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, गंगापुर ते वैजापुर रोडवरिल मांजरी फाटा येथे एक ईसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतुस (राऊंड) हे चोरटी व अवैधरित्या विक्री करण्यासाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे सपोनि साईनाथ गिते व त्यांचे पथकांने मांजरी फाटा येथे सापळा लावुन लपुन बसले. मिळालेला वर्णनाचा ईसम हा मांजरी फाटो येथे आल्यानंतर पोलीस त्याचे हालचालीवर लक्ष ठेवून असतांना त्याला त्याचा संशय आल्याने त्यांने तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता गंगापुर पोलीसांनी त्याचा तात्काळ पाठलाग करून पकडले.
यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मधुकर जगन्नाथ पाटोळे वय ३२ वर्ष रा. महालगाव ता. वैजापुर असे सांगितले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक काळ्या रंगाचा गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस (राऊंड ) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळुन आला आहे. गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आली आहेत. त्याचे विरूध्द पोलीस ठाणे गंगापुर येथे कलम ३,२७ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गंगापुर पोलीस करित आहेत.
सदरची कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापुर, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अशोक चौरे, सपोनि. साईनाथ गिते, पोलीस अंमलदार भारत घुगे, नागरे यांनी केली आहे.