मुंबई प्रतिनिधी : गुढी पाडवा हा आनंदाचा दिवस मानला जातो, मात्र किरण माने यांच्या कुटुंबासाठी हा दिवस दुःखाचा ठरला. अभिनेते किरण माने यांच्यावर गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचे वडील दिनकरराव मारुती माने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी, सातारा येथे शेवटचा श्वास घेतला.
किरण माने यांनी स्वतः ही दुर्दैवी बातमी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मित्र, नातेवाईक आणि चाहत्यांसाठी हा दु:खद संदेश दिला. त्यांच्या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना धीर देणाऱ्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
माझे नातेवाईक,मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या माहितीसाठी…
माझे वडील दिनकरराव मारुती माने यांचे आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता संगम माहुली, सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.