गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 23 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शुक्रवारी (29 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा गावात गोंदिया कुमार राज्य महामार्गावरील नाल्याजवळ घडली. घटनास्थळावर नागरिक आणि पोलीस पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे.
या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.” आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २३ जखमी असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली होती.
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री शिंदे
गोंदिया जिल्ह्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशीही सूचना त्यांनी दिली.
पी एम रिलीफ फंडातून २ लाख रुपये प्रत्येकी मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले , “मी महाराष्ट्रातील गोंदियातील बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.”
मृत प्रवाशांची नावे
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार – अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार – पिपरी, जि. भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार – पिपरी, जि. भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि. चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय – 65 वर्ष, राहणार – चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार – चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय – 42 वर्ष, राहणार – घोटी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय – 45 वर्ष, राहणार – घोटी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय – 35 वर्ष, राहणार – बेसा, नागपूर
टीप : मृत्यू झालेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. एकूण 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे.
जखमी प्रवाशांची नावे
1) नैतिक प्रकाश चौधरी, वय – 8 वर्ष, राहणार – कामठी, जि. नागपूर
2) श्रीकृष्ण रामदास उके, वय – 47 वर्ष, राहणार – कोसबी, जि. भंडारा
3) शारदा अशोक चव्हाण, वय – 63 वर्ष, राहणार – नागपूर
4) पल्लवी प्रकाश चौधरी, वय – 33 वर्ष, राहणार – कामठी, जि.नागपूर
5) लक्ष्मी धनराज भाजीपाले, वय – 33 वर्ष, राहणार – गोंदिया
6) स्वप्नील सुभाष हेमणे, वय – 40 वर्ष, राहणार – नागपूर
7) विद्या प्रमोद मडेकरी, वय – 63 वर्ष, राहणार – नागपूर
8) भार्गवी राजेश कडू, वय – 15 वर्ष, राहणार – नागपूर
9) धृविका स्वप्नील हेमणे, वय – 6 वर्ष, राहणार – नागपूर
10) टीना यशवंत दिघे, वय – 17 वर्ष, राहणार – सोमलपूर