येवला प्रतिनिधी
राज्यात वाढत असलेली गोवर रुग्णांची संख्या पाहता गोवरचा उद्रेक होण्यापूर्वीच शहरासह संपूर्ण तालुक्यात घरोघरी जाऊन लहान बालकाचे लसीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचा वतीने प.समिती तालुका आरोग्य अधिकारी शरद कातकडें यांना देण्यात आले .
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि ग्रामीण भागात गोवर चे रुग्ण झपाट्याने वाढत असून राज्यांमध्ये बालकांसह वयस्कर व्यक्ती यांनाही या आजाराची लागण झाल्याचे दिसत आहे, गोवरचा उद्रेक वाढू नये कोरोनापेक्षा पाचपट वेगाने गोवर पसरत आहे. गोवरचा सर्वाधिक धोका नवजात बालकापासून पाच वर्षे वयाच्या मुलांना आहे. साथ पसरू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावे असेही वंचित बहुजन आघाडीचा मागणीत करण्यात आले आहे
गोवर आजाराचा साथीचा उद्रेक पाहता येवला तालुक्यातील शहरासह गावागावात, वाडी वस्ती येथे गोवर लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जाऊन योग्य खबरदारी घेत गोवर लसीकरण मोहीम राबवत मार्गदर्शन करण्याचे नमूद केले आहे
कारण मुंबईत साथ पसरली असून ही साथ अनेक जिल्ह्यांमध्ये गोवरचा शिरकाव करू लागली आहे. लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असून यामध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे .मागील अनेक दिवसापासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे रूग्ण आढळून येत आहेत.लहान मुला शिवाय मोठ्या व्यक्तीमध्ये गोवरचे प्रमाण दिसून आले आहे. मुंबईसह राज्यात नागपूर, नाशिक, अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. एकंदरीत गोवरचा उद्रेक वाढत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील आरोग्य विभागाने सर्व अंगणवाडीच्या सेविकासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन बालकांना लसीकरण केले की नाही याची चौकशी करून तपासणी करावी. गोवर वाढणार नाही यासाठीही जनजागृती करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचा वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई साबळे, शबनम शेख जिल्हा संघटक, संगीता साबळे शहराध्यक्ष , वाल्हुबाई जगताप यांच्यासह संजय पगारे येवला तालुका अध्यक्ष,दयानंद जाधव युवक जिल्हा उपाध्यक्ष, भाऊसाहेब आहीरे जिल्हा उपाध्यक्ष,दिपक लाठे रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष, पोपट खंडागळे, अविनाश धिवर,शशिकांत जगताप,साहेबराव भालेराव,राजेंद्र कांबळे,अजहर शाह,सुनिल सोनवणे,गौतम जोगदंड,सुनिल पगारे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते