ग्रंथसोबती पुरस्कार दिनकर झिंब्रे यांना प्रदान

0
फोटो : दिनकर झिंब्रे यांना पुरस्कार प्रदान करताना सारंग पाटील, शेजारी डॉ.माने, पाटणे व मान्यवर.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : जिल्हा ग्रंथालय संघातर्फे संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांना खा.श्रीनिवास पाटील यांचे चि.सारंग पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये,ता. सातारा येथे स्व.डॉ. विनायकराव गायकवाड स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथसोबती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

         यावेळी अध्यक्ष संभाजीराव पाटणे,प्राचार्य यशवंत पाटणे, साहित्यिक डॉ.राजेंद्र माने,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे,प्राचार्य डॉ.बि.एस. सावंत,प्राचार्य डॉ.चंद्रकांत नलवडे आदी ग्रंथालयप्रेमी उपस्थित होते. याबद्धल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी झिंब्रे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here