विदर्भातील काही जिल्ह्यांत वाघांनी धुमाकूळ घालत माणसावर हल्ले सुरू केले आहेत. यात काही जणांचे बळीही गेले आहेत. दुसरीकडे वाघांची संख्याही वाढत चालली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वाघांची संख्या खूप वाढत आहे. त्यावर काय उपाय? या प्रश्नावर दिव्य मराठीशी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात राज्यांतून वाघ मिळतील का, अशी विचारणा होत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीत वाढलेले वाघ त्यांना देणार आहे. केंद्राकडून पाच वाघांच्या स्थलांतरणाची परवानगी घेतली आहे. शहरालगतचे वाघ जेरबंद करून दाट जंगलात सोडायचे किंवा वाघांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी द्यायचे असा प्रयोग करीत आहोत.
“नैसर्गिक अधिवासातील वाघांना इतर नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. केंद्राशी चर्चा करून सविस्तर आराखडा तयार करायचा आहे.”