चांदे सहकारी सोसायटीची बँक पातळीवर 100 टक्के वसुली 

0

पोहेगांव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील चांदे विकास सोसायटीने  बँक पातळीवर 30.06.2024 अखेर वासुलास पात्र असलेले कर्ज 100 टक्के कर्जाची वसुली जिल्हा बँकेला दिली आहे  असे संस्थेचे अध्यक्ष दगु सखाराम होन दिली .

संस्थेचे उपाध्यक्ष  मधूकर खरात, पाराजी होन,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंदराव चव्हाण, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण ,चंद्रकांत होन, नामदेव होन, संदिप  होन, पुंजाजी होन, बाळासाहेब खंडिझोड,शरद होन, सौ.गीताबाई  चव्हाण,राधुजी कोळपे,  अर्जुन  होन ,मधुकर होन, ,विलास चव्हाण,राजु होन,सचिव गोरक्षनाथ फटांगरे ,सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद तसेच वसुलीसाठी कोपरगाव तालुक्याचे तालुका विकास अधिकारी अविनाश काटे , वसुली अधिकारी  अशोक लोहकरे, शाखेचे इन्स्पेक्टर विरेश गाडे, शाखेचे शाखाधिकारी  भानुदास बैरागी  यांनी मोलाचे सहकार्य लाभल्याचे संस्थेचे अध्यक्ष दगु होन यांनी सांगितले.

वेळेत कर्ज फेड केल्यामुळे संस्थेच्या सभासदांना केंद्र व राज्य शासनाकडून व्याज दरात सवलत मिळणार असल्याची माहिती देत संस्थेने शंभर टक्के वसुली दिलेल्या सभासदांचे आभार व्यक्त करून त्यांनी केलेला व्याजाचा भरणा बँकेच्या धोरणा प्रमाणे सभासदांच्या बचत खात्यात जमा केल्याचे सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here