चांदोली परिसरातील धबधबे लागले वाहू ; सोयी-सुविधांच्या अभावामुळे पर्यटक वंचित

0

गणेश माने, वारणावती;

शिराळा तालुक्यातील पश्चिम व शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागात येणाऱ्या  चांदोली परिसरात गेल्या महिण्याभरात होणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे  ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परिसरातील छोटे मोठे धबधबेही वेगाने कोसळू लागले आहेत.

चांदोलीच्या पायथ्याला असणारा उखळूचा धबधबा, शित्तूर जवळील  राऊतवाडीचा आगरकडा तसेच सोनवडे येथील मरगोबा, गुढे- पाचगणी  पठार,  जाधववाडी या सर्व परिसरातील उचावरून फेसाळत पडणारे धबधबे नयनरम्य आहेत. चांदोली धरणाच्या उत्तरेला उखळू येथे असणारा सर्वात मोठा धबधबा व वसंत सागर जलाशय हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या ठिकाणी  ट्रेकिंगसाठी निर्सग गमन  सुंदर असा मनमोहक करणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय त्याच बरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पडणार असे छोटे मोठे असख्य धबधबे या विभागात आहेत मात्र या ठिकाणी   महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन या छोट्या मोठ्या  धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोईचा  केला तर येणाऱ्या पर्यटकांना सह्याद्री च्या कुशीतीत निर्सग सौंदर्याचा आनंदा घेता येईल 

: चांदोलीकडे येण्याऱ्या वर्षा सहलीच्या पर्यटकांना सुव्यस्थीत मार्गासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे 

पर्यटक शेखर पोतदार खुजगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here