चाईल्ड केअर तर्फे वेश्वी आदिवासी वाडीवर दिवाळी वाटप.

0

उरण दि 25(विठ्ठल ममताबादे ) चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड तर्फे दि.24/10/2022 रोजी उरण तालुक्यातील वेश्वी आदिवासी वाडी मध्ये दिवाळी चे सामान (साखर, मैदा, रवा, तूप, तेल, उटणे, चिवडा, तांदूळ) आदिवासी बंधु भगिनीना वाटप करण्यात आले.हे कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे  औचित्य साधून उरण तालुक्यातील पत्रकार श्रेत्रात उलाखनीय कार्य करणारे  मिलिंद खारपाटील यांना चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष  विकास कडू यांच्या हस्ते  “उरण विशेष सन्मान 2022” हा पुरस्कार (सम्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, संस्थेचे प्रमाण पत्र,तुळशी रोपटे) देऊन सन्मानित करण्यात आले. 

तसेच अभिनय श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी  केल्या बद्दल उरण तालुक्यातील भेंडखळ गावातले सुपुत्र  राजेश ठाकूर यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विकास कडू यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विकास कडू म्हणाले "समाजातील आसे काही घटक आहेत कि त्यांना दोन वेळचे जेवण ही मिळत नाही त्यांना आपण काहीतरी सामाज्याचे देणे लागतो हे ब्रीद लक्षात घेऊन चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण,रायगडच्या वतीने आदिवासी वाड्यामध्ये या बंधू भगिनींना थोडे का होईना सुख समाधान मिळेल आसे छोटे छोटे उपक्रम राबवत आहे. त्यातलाच हा एक उपक्रम म्हणजे आदिवासी वाडी मध्ये दिवाळी सामानचे वाटप. हे कार्य करताना आम्हाला सर्व सभासदांना खूप आनंद होत आहे"

महादेव घरत यांनी आपले मनोगत मांडताना म्हणाले कि “चाईल्ड केअर सामाजिक संस्था खूप मोलाचे कार्य करत आहे त्यांची संपूर्ण उरण तालूक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यात  कौतुक,व्हा व्हा होत आहे पुढे ही संस्था खूप मोठे मोठे कार्य करेल यात काही शंका नाही. संस्थेचे संस्थापक  विकास कडू यांचे करावे तितके कौतुक कमी पडेल. त्यांनी ही संस्था सात वर्ष चांगल्या पद्धतीने चालवली आहे”

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी  नारायण तांडेल (सोनारी ), जितेंद्र ठाकूर (सावरखार) ,कु उद्धव कोळी (मोरा ), नीता डाऊर (महाराष्ट्र पोलीस),डॉ.स्वाती म्हात्रे (आवारे  ), अध्यक्ष -झेप सामाजिक संस्था), माउली बचत गट भेंडखळ,कु. कुणाल पाटील (पागोटे ), जयप्रकाश पाटील (नवघर), नितीशा पाटील, वृषाली ठाकूर  (भेंडखळ ),  वर्षा म्हात्रे, शिक्षिका (कुभारवाडा ), सुजित तांडेल (पागोटे )यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच संस्थेतर्फे मनोज ठाकूर (जसखार),तुषार ठाकूर,राजेश ठाकूर (भेंडखळ), निवृत्ती ठाकूर (धुतूम )ह्रितिक पाटील (नागाव ), अभिषेक माळी (बालई),आदित्य पारवे (उरण ) या सभासदांनीही योगदान दिले.

सदर कार्यक्रमास महादेव घरत  (अध्यक्ष -द्रोणागिरी स्पोर्ट असो. ),  नारायण तांडेल (अध्यक्ष जासई विभाग), रमणिक म्हात्रे (संचालक-शिक्षक पतपेढी संस्था )प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.चाईल्ड केअर संस्थेचे विकास कडू (संस्थापक), विक्रांत कडू (कार्यध्यक्ष), तुषार ठाकूर (उपाध्यक्ष ),निवृत्ती ठाकूर (उपाध्यक्ष ),कु. ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष ),कु. अभिषेक माळी (सचिव ),कु.उद्धव कोळी,कु. आदित्य पारवे, कु. हर्षद शिंदे, कु. धीरज घरत, कु.रोशन धुमाळ, कु. विवेक कडू  हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक  विकास कडू यांनी मांडले तर सूत्रसंचालन  रमणिक म्हात्रे यांनी केले. आभार प्रदर्शन विक्रांत कडू यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here