चिरनेरमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न.

0
उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे)उरण तालुका विधी सेवा समिती तसेच उरण तालुका वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर चिरनेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एन. एम. वाली दिवाणी न्यायाधीश क स्तर उरण, श्रीमती पी एन.पठाडे २ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर उरण यांच्या मार्गदर्शना खाली कायदेविषयक मार्गदर्शन जनतेला करण्यात आले.राईटस ऑफ सिनिअर सिटिझन या विषयावर अडव्होकेट केवल गावंड, राईट्स माफ मायनर या विषयावर अडव्होकेट वृषाली पाटील तर राईटस ऑफ फिमेल या विषयावर अडव्होकेट डी व्ही नवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सर्वांनी कायद्याचे पालन करावे. समाजात शांतता व सुव्यवस्था कशी नांदेल याविषयी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन दिवाणी न्यायाधीश एन. एम. वाली यांनी यावेळी केले. यावेळी चिरनेर ग्रामपंचायतचे सरपंच संतोष चिर्लेकर,ग्रामविकास अधिकारी महेश पवार, चिरनेरचे पोलिस पाटील संजय पाटील, कृष्णा व्यापारी, मनिन चिर्लेकर , श्रीधर मोकल, शकुंतला चिर्लेकर,जागृती स्वयं सहायता स्वयंरोजगार संस्था कार्यकारी तसेच रायगड जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती जयवंती गोंधळी, चिरनेर बचत गट सीआरपी शंकुतला चिर्लेकर, चिरनेर गावचे नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here