उरण दि ५(विठ्ठल ममताबादे ) : चिरनेर आदिवासी आश्रम शाळा मध्ये जे.व्ही के सुतार फाउंडेशन यांच्या माध्यमातून कु. कै.विनीत किसन सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचा वाटप तसेच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते किसन सुतार आणि सामाजिक संस्था तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा अनंत घरत,विधानसभा युवक अध्यक्ष मयुर सुतार, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, शेवा गावच्या ग्रामपंचायत सदस्य भावना भोईर, रोहित भोईर मंजुळा घरत परेश घरत, एल जी म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.