उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) : 1 ते 19 वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून तसेच परिसर अस्वछतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते.याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य रक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट शासनामार्फत ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने दिनांक 10/10/2022 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर आश्रम शाळा येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, डॉ वंदन पाटील, उरण तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ राजाराम भोसले, डॉ महेंद्र धादवाड, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, पब्लिक हेल्थ युनिटचे प्रणिती संकपाळ,आरोग्य सहाय्यक -एस.एस.घाडगे, ए. एच. पाटील,सुनिलराज सैदाणे,सर्व सीएचओ, सर्व आरोग्य सहाय्यक , सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते. आश्रमशाळेतील मुलांनी सुंदर डान्स व गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.