चैत्र सप्तमी निमित्ताने मर्दनगड किल्यावर एकविरा शिवभक्तांचा महापूर

0

रण दि १७(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील  आवरे येथील मर्दनगड किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समिती आवरे तर्फे बांधण्यात आलेल्या एकविरा देवी मंदिरात चैत्र सप्तमी निमित्ताने  एकविरा माता उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

उत्सवाच्या निमित्ताने  आयोजक मर्दनगड संवर्धन समिती संस्थापक कौशिक ठाकुर , सरपंच निराताई पाटील,सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर, प्रभाकर म्हात्रे,महेश गांवड, गणेशप्रसाद गांवड , संदीप गांवड ,विद्याधर गांवड , गाव अध्यक्ष संजय गांवड ,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील,अरुण गांवड, बाळकृष्ण गांवड  कृष्णा पाटील ,  गड संवर्धक प्रशांत भोईर या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिषेक,होम ,गडपूजन, व पालखी सोहळा अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आवरे गावातील व पंचक्रोशीतील एकविरा शिवभक्तांनी सकाळ पासून उपस्थिती दाखवून आई माऊलीचा उदो उदोच्या जय घोषात दर्शन घेतले.ग्रामस्थ आवरे ,एकविरा बिटस चे आशुतोष म्हात्रे,सोमवार आरती, मंडळ, खासरी पाडा महिला मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर पाटील,दिपेश ठाकूर, दिलेश ठाकूर, विनोद ठाकूर, हितेंद्र म्हात्रे,तुषार म्हात्रे,संजय गावंड,धिरज ठाकूर, संतोष म्हात्रे यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here