वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल.
बारामती: धुमाळवाडी ता. बारामती जि. पुणे
दारु पिऊन आई वडीलांना नेहमी मारहाण करने जमीन वाटुन मागणे तसेच जीवे मारण्याची धमकी देणे या त्रासाला कंटाळुन धुमाळवाडी ता. बारामती येथील लालासो धोंडीबा कोकरे रा. धुमाळवाडी, यांनी दिनांक 14/11/2023 रोजी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान आपला मुलगा गणेश लालासो कोकरे वय 30 वर्षे अहिल्यानगर धुमाळवाडी ता. बारामती जि पुणे हा झोपलेल्या जागेवर झोपेमध्ये असताना घरातील लोंखडी पहार घेऊन डोक्यावर 7 ते 8 वेळा मारुन खुन केला. The father killed the drunken son
घटनेचे गांभीर्य पाहून अविनाश लालासो कोकरे, वय 27 वर्षे, आरोपी यांचा दुसरा मुलगा याने आरोपी लालासो धोंडीबा कोकरे वय 59 वर्षे रा.अहिल्यानगर धुमाळवाडी ता. बारामती जि पुणे यांचे विरोधात कायदेशिर तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारी वरून माळेगांव पोलिस स्टेशन येथे आरोपी याच्या विरोधात भा.द.वि. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई साळवे करत आहेत.