जयकुमार गोरेंनी घेतली शिक्षकांची शाळा

0

दीड लाख पगार घेणाऱ्या झेडपीच्या शिक्षकाचा पोरगा इंग्रजी मीडियममध्ये

सांगली : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेनी एकप्रकारे शिक्षकांचीच शाळा घेतलीय. दीड लाख पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या दाम्पत्याचा मुलगा इंग्लिश मीडियम शाळेत शिकतो आणि त्या इंग्लिश मीडियम मधील शिकवणाऱ्या मॅडमला पगार 12 हजार आहे.
असे म्हणत इंग्लिश मिडीयम शाळाचे पेव कुणामुळे फुटलेय? असा सवालही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी उपस्थित केलाय. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने 31 शिक्षिकांचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते.

शाळेचा पट का कमी होत आहे, याकडे शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज- जयकुमार गोरे

सध्या इंग्लिश माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. इंग्रजी आले पाहिजे, मात्र आपली संस्कृती सोडून या गोष्टी होता कामा नये. आता इंग्रजी माध्यमाकडे ओढा का वाढला याचा विचार शिक्षकांनी करण्याची वेळ आली आहे. प्राथमिक शिक्षकांनी शाळेचा पट का कमी होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्राथमिक शाळांचा पट जास्त आहे, अशा शाळांची यादी करून तिथला अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही, मात्र शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडू नये, असे ही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी आवाहन केले.

‘हम दो, हमारे दो’चा कायदा केला पण लोक हम दो, हमारे एक वर आले

वाड्या वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सरकारने प्रचंड पैसा खर्च केला असताना आता या शाळा मधील पटसंख्या कमी होत असल्यावरुन सरकार समोर बाका प्रसंग उभा राहत असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेय. तसेच सरकार एका बाजूला म्हणतेय ‘हम दो, हमारे दो’ आणि दुसऱ्या बाजूला शाळांमध्ये मुले नाहीत, असा सूर आहे. आता माझे हम दो पण नाही आणि हमारे दो पण नाही, त्यामुळे मला यावर आता बोलायचा अधिकार नाही. पण हम दो, हमारे दो चा कायदा आला पण हम दो, हमारे एक वर आलेय. याने शाळेत आता मुलेच नसल्याने पटसंख्या कमी आहे. त्यामुळे या वस्ती शाळेवरती सरकारने प्रचंड पैसा खर्च केला असताना आता या शाळेत मुलांची पटसंख्या कमी होत असल्याने सरकारसमोर या शाळांचे करायचे काय? असा बाका प्रसंग उभा राहिला आहे. असे पडळकर म्हणालेत.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा परिषद व नगरपालिका क्षेत्रातील गुणवंत 31 शिक्षिकांचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी गोपीचंद पडळकर बोलत होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here