
संगमनेर : क्षयमुक्त जगासाठी शिलेदार होऊया, सारे मिळून इतिहास घडवूया यासाठी संगमनेर तालुक्यातील व शहरातील क्षयग्रस्त रुग्णांना आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद महिला मंचच्या वतीने क्षयग्रस्तांना माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते प्रोटीनयुक्त किडचे वाटप करण्यात आले.
संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज हॉस्पिटल येथे माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत क्षयग्रस्तांना किडचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ.सुनिताताई कांदळकर, आशाताई वाकचौरे, जिल्हा क्षय चिकीत्सक अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाबळे, पर्यवेक्षक संदीप रुपवते, अस्लम शेख, आदेश राठोड ,डॉक्टर्स, आशा सेविका व परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्या की,जगात क्षयरोगाचे प्रमाण खूप जास्त आहे. याचे मुख्य कारण कुपोषण आहे. महिलांनी आहारामध्ये प्रोटीन युक्त पदार्थाचे प्रमाण वाढवले पाहिजे. क्षयरोग हा आजार संसर्गजन्य असून खोकल्याच्या माध्यमातून तो पसरतो. यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे क्षयरोग आपल्याकडे आढळतात. मागील काळात पोलिओ ,देवी यांसारखे भयंकर साथीचे आजार यांचे निर्मूलन काँग्रेसच्या काळात आपण केले. कोरोनासारखा महाभयंकर आजारही आपल्याकडे आला. सर्वांनी स्वच्छता पाळली पाहिजे. क्षयरोगाबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. भारत देश हा विकसनशील देश आहे. स्वच्छता न पाळल्यामुळे क्षयरोग पसरतो. व्यवस्थित काळजी घेतल्यास व आहारात प्रोटीन युक्त पदार्थाचे सेवन केल्यास हा आजार नक्की बरा होतो. म्हणूनच राज्याचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद महिला मंच अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते त्या अंतर्गतच क्षयग्रस्तांना प्रोटीन युक्त कीडचे वाटप करत अल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप यांनी क्षयरोगाचा प्रसार कसा होतो व त्याच्या निर्मूलनासाठी काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. यावेळी डॉक्टर्स, अशा सेविका, पर्यवेक्षिका परिचारिका , रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.