सातारा/अनिल वीर : जलसंधारण विभागाचे सातारा – जावलीचे उपअभियंता आर वाय शिंदे हे त्यांच्या कार्यालयात शासकीय कामाच्या वेळी हजर नसतात. तेव्हा सखोल चौकशी करावी. याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना आरपीआय (ए)तर्फे जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी निवेदन सादर केले आहे.
ऑफिसमध्ये गेले असता मीटिंग ला गेलो आहे, साइटवर गेलो आहे…. अशी खोटी उत्तरे मिळाली जातात. सदर उपअभियंता आर वाय शिंदे शाखा अभियंता खामकर यांच्या दररोज रोजनिशी फिरती रोजी कार्यक्रम (ATP) ची चौकशी करावी.तसेच सदर अधिकारी हे गेल्या आठ वर्षापासून सातारा मध्येच कार्यरत कसे ? त्यांना बदलीचा कायदा लागू नाही का ? हा प्रश्न कार्यालयात सुरू असतो? तरी संबंधित अधिकाऱ्याची पाठराखन एवढी कशासाठी ? सदर त्यांच्या पंचायत समिती बांधकाम विभागाच्या संपूर्ण झालेल्या विविध हेड मधील कामाची व जलसंधारण विभागाच्या विविध हेड मधून झालेल्या संपूर्ण कामाची पुनश्च वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत संपूर्ण कामाची SQM समिती कडून सखोल चौकशी करावी. तसेच आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या ठेकेदारांची आर्थिक लूट करणाऱ्या उपअभियंता आर वाय शिंदे व शाखा अभियंता खामकर यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.