जसखारच्या सरपंचपदावर प्रणाली म्हात्रे विराजमान.

0

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील जसखार गावाच्या सरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे ह्यांनी एका विशेष समारंभात, सन्मानाने पदभार स्वीकारला. जसखार ग्रामपंचायतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली, तेव्हापासून आतापर्यंतच्या सुमारे ८० वर्षांच्या कालावधीत, सर्वात कमी वयाची आणि पदवीधर सरपंच म्हणून झालेली त्यांची निवड हा एक रेकॉर्ड आहे.

       

प्रणाली म्हात्रे ह्या उत्तम सामाजिक कार्यकर्त्यां असून, युवा सामाजिक संस्थेच्या कार्यात आघाडीवर असतात. तसेच त्या शिवसेनेच्या महिला तालुका अध्यक्ष ह्या पदावर कार्यरत असून राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करित आहेत ज्यामध्ये त्यांना सासर आणि माहेरच्या कुटुंबाचा नेहमी पूर्ण पाठिंबा मिळाला आहे .जसखार गावातील अनेक समस्या सोडविण्यात त्या आणि त्यांच्या इतर पाच सहकारी महिला सदस्या नेहमीच पुढाकार घेतात. सीमा ठाकूर, दमयंती म्हात्रे, हेमा ठाकूर, धनवंती ठाकूर आणि वैजयंती ठाकूर ह्या पाच रणरागिनींच्या सहकार्याने त्यांनी गेल्या दीड वर्षात जसखार ग्रामपंचायतीमध्ये गेली वीस वर्षे चालणारा प्रचंड भ्रष्टाचार,एका कुटुंबाची घराणेशाही संपवून टाकण्याचा अथक प्रयत्न चालवीला आहे.

        जसखार मधील बहुसंख्य ग्रामस्थ त्यांचे अभिनंदन करित असून स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी ह्या सहा महिला सदस्यांना पाठिंबा व्यक्त करित आहेत. पूर्वीच्या अशिक्षित, घराणेशाहीने लादलेल्या सरपंचांपेक्षा ही सुशिक्षित आणि प्रामाणिक सरपंच गावाचा निश्चित कायापालट करील असा ग्रामस्थांना ठाम विश्वास वाटतो आहे. समाजाच्या सर्व थरातून प्रणाली आणि तिच्या पाच सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून एका नवीन युगाची सुरुवात होण्याची अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत.

     

   सदर पद ग्रहण समारंभाच्यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते सर्वश्री रुपेश पाटील, अतुल भगत, दीपक ठाकूर, गणेश घरत , अभिमन्यू निंबाळकर , अनिल मुंढे आणि युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी हर्षल ठाकूर, किशोर म्हात्रे, संदीप भोईर,नितीन पाटील,गर्दीश म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, सुरेश म्हात्रे, निशांत ठाकूर,जनार्दन म्हात्रे,प्रदीप म्हात्रे,जयवंत घरत, मयूर तांडेल, रणजित पाटील,रितेश म्हात्रे,तेजस घरत, गणेश ठाकूर, भालचंद्र म्हात्रे, मनिष म्हात्रे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच महिला आघाडीच्या मंजुळा म्हात्रे, प्रीती ठाकूर,आशा म्हात्रे, आशा कडू आणि बचत गटाच्या अनेक सदस्या शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here