जांबला जळकोट मध्ये समाविष्ट करून जांब-जळकोट एकत्रित तालुका करा : जयपाल गायकवाड 

0

तालुका निर्माण संघर्ष कृती समिती होणार स्थापना 

जांब (बु) : सध्या उदगीर जिल्हा घोषित होणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील माध्यमात २६ जानेवारीला उदगीर जिल्हा होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यानुषंगाने पुन्हा एकदा जांब-जळकोट तालुका निर्मितीची चर्चा सुरु झाली. जांब येथील सामाजिक कार्यकर्ते जयपाल गायकवाड यांनी जांबला जळकोट मध्ये समाविष्ट करून जांब-जळकोट असा एकत्रित तालुका जाहीर करण्याची मागणी केली आहे.

उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली सुरु झाल्या असून मुखेड व कंधार तालुक्यातील १७ गावांचा उदगीर जिल्ह्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. १९९९ साली उदगीर तालुक्याचे विभाजन होऊन देवणी आणि जळकोट तालुक्याची निर्मिती झाली होती. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील १७ गावांना जळकोट तालुक्याला जोडण्याचे निश्चित झाले असतानाही त्या गावांनी विरोध केल्यामुळे जळकोटमध्ये समाविष्ट झाले नव्हते.

पुन्हा एकदा उदगीर जिल्हा निर्मितीच्या निमित्ताने जांबसह परिसरातील १६ गाव जळकोट तालुक्यात समाविष्ट होण्यास अनुकूल आहेत. मात्र जांब येथील जनतेची नवीन मागणी पुढे आली असून जळकोट तालुक्यात समाविष्ट होण्यास तयार आहोत पण जांब-जळकोट असा एकत्रितपणे तालुका निर्मिती करावा. जांब आणि जळकोट दोन गावात फक्त २ किलोमीटरचे अंतर आहे. मागील २५ वर्षात दोन्ही शहराच्या सीमेपर्यंत बाजारपेठ, वस्ती निर्माण झाल्यामुळे जांब-जळकोट एकच शहर झाल्याचे दिसते. 

जांब-जळकोट तालुका निर्माण संघर्ष कृती समिती स्थापना करणार 

जांब येथील नागरिकांनी मागील २५ वर्षांपूर्वी काय झाले याकडे लक्ष न देता पुढील भविष्यासाठी जांब-जळकोट असा तालुका निर्मितीसाठी एकत्र येत आहेत. त्यासाठी जांब-जळकोट तालुका निर्माण संघर्ष कृती समितीची स्थापना करून मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार असल्याचे जयपाल गायकवाड यांनी सांगितले. तसेच १६ गावांचा जांब-जळकोट तालुका निर्मितीस पाठिंबा दर्शिवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here