पैठण,दिं.२६ : सामाजिक वनीकरण विभाग औरंगाबाद परिक्षेत्र पैठण अंतर्गत जायकवाडी येथील नारळी बाग परीसरात ४.२५ हेक्टर क्षेत्रावर विविध वृक्षासह वनस्पतीचे १ लाख २७ हजार ५०० रोपांची लागवड या ठिकाणी कैली जाणार असून याची सोमवार( ता.२६) रोजी औंरगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक औंरगाबाद सत्यजित गुजर, उपायुक्त रोहयो समिक्षा चंद्रकार,विभागीय वनाधिकारी किर्ती जमदाडे, उपजिल्हाधिकारी रोहयो मंदार वैद्य, मेघना बडजाते, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे,एन व्ही पाखरे यांची उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, आजच्या घडीला वृक्ष लागवड काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावे तर विद्यार्थ्यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी केल्यास यश हमखास मिळते.
यावेळी पैठण येथील श्रीनाथ हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या समवेत स्पर्धा परिक्षा संदर्भात चर्चा केली यावेळी सुनील चितळे सह आदी शिक्षक उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जी एस सातपुते,ए टी पाटील,वनपाल जी ए वैद्य,निता फुले,एस आर जाधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल चितळे यांनी केले.
————-
फोटो : पैठण : सामाजिक वनीकरण विभाग औरंगाबाद परिक्षेत्र पैठण अंतर्गत जायकवाडी येथील नारळी बाग परीसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सह आदी.(छायाचित्र: विनायक मोकासे)