
सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ या छ. शिवराय यांचे एकमेव गुरू होते.शिवाय, विद्यापीठ होते.असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सीताराम सकपाळ यांनी केले.
सौ.विनिता राजेंद्र सत्वधीर यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रम विक्रोळी येथील समाज मंदिर हॉलमध्ये संपन्न झाला.तेव्हा सीताराम सकपाळ आदरांजलीपर मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी नामदेव कंठे होते.सपकाळ पुढे म्हणाले, “मनुष्य किती जगला ? यापेक्षा त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श नव्या पिढीस मिळत असतो. विनिताताई यांनी परिवारास समृद्धीचा आयाम दिला.”
आर.जी.भंडारे म्हणाले, “माणुसकीचा भाव ठेवुन सामाजिक संसाररूपी गाडा एकत्रीत चालवला पाहिजे.तरच उत्तरोत्तर प्रगती साधता येईल.”
एन.बी.गायकवाड म्हणाले, “दुःख:चा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे.” गौतम काकडे म्हणाले,”धम्म हा जिवंत जगण्याची कला आहे.” विजय थोरवडे म्हणाले,”विनिताताई यांनी संसाररूपी पाहिलेली स्वप्ने अकाली जाण्याने उद्धवस्थ झाली आहेत.” बौद्धाचार्य उत्तम पवार म्हणाले,”धम्ममय जीवन व्यतीत केले तर माणुसकी चा खरा-खुरा अर्थ समजतो.” यावेळी भीमराव दाभाडे, के.आर. शेलार,अरविंद गुजर, अनिल वीर, अनिल सावंत, अनिल मोहिते, सुरेश कांबळे, साहेबराव अडसूळे आदींनीही आदरांजलीपर मार्गदर्शन केले. बौद्धाचार्य दयानंद बडेकर यांनी विधी व सूत्रसंचालन केले.सिद्धार्थ सत्वधीर यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास सुदाम सुतार,सुनील वीर,सिद्धार्थ शिंदे, उत्तम सरगडे,भगवान बंडू भोळे (तामकणे),सत्वधीर-कंठे परिवार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.