मुंबई: भारताचे चांद्रयान-३ चंद्राचे रहस्य शोधण्यात व्यस्त आहे. अवघ्या काही दिवसांत प्रज्ञान रोव्हरने अशा अनेक गोष्टी शोधून काढल्या आहेत, ज्यांच्याबद्दल जगाला आजपर्यंत काहीही माहिती नव्हती. चांद्रयान-३ ने चंद्रावर अॅल्युमिनियम, सल्फर, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचा शोध लावला आहे, असे इस्रोने म्हटले आहे. अजून बरेच काही शोधायचे बाकी आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की जगात एक अशी जागा आहे जिथे चक्क दारूचा पाऊस पडतो. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने काही काळापूर्वी जगाला याबाबत सांगितले होते.
नासाने सांगितले की, ‘मद्याचे थेंब पाणी आणि बर्फाप्रमाणे या ग्रहावर पडत असतात. यामुळे, संपूर्ण ग्रहावर सर्वत्र तुम्हाला फक्त दारूच दिसेल. अल्कोहोल या ग्रहावर सूक्ष्म आण्विक स्वरूपात आहे, ज्याला वैज्ञानिकच्या भाषेत प्रोपेनॉल रेणू म्हणतात. मात्र, ते पिण्याच्या योग्य नाही आणि कोणीही ते पिऊ शकत नाही. एवढंच नाही तर ते पृथ्वीपासून इतके लांब आहे की, विचार केला तरी त्याला तिथे आणण्याची कल्पनाही करता येत नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ठिकाण कुठे आहे? हा ग्रह आपल्या आकाशगंगेच्या केंद्राच्या अगदी जवळ आहे. जिथे तारे जन्माला येतात. त्याचे नाव सॅगिटेरियस B2 असल्याचे सांगितले जाते. नासाच्या म्हणण्यानुसार, हे ठिकाण जिथे आहे, तिथे आपल्या आकाशगंगेत एक मोठे कृष्णविवर (ब्लॅक होल) आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर अंदाजे १७० प्रकाश-वर्षे लांब आहे.
अटाकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलीमीटर अॅरे टेलिस्कोपने हे ठिकाण २०१६ मध्ये शोधले होते. तेव्हापासून अमेरिकन अंतराळ संस्था त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. येथील प्रत्येक उपक्रमावर संशोधन केले जात आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, हे एक अतिशय अनोखे ठिकाण आहे, ज्याबद्दल जगाला काहीही माहिती नव्हती.
चिनी शास्त्रज्ञांनी यावर संशोधनही केले. त्यांच्या मते, सॅगिटेरियस B2 हा वायू आणि धुळीचा प्रचंड आण्विक ढग आहे, ज्याचं वस्तुमान सुमारे तीस लाख आहे. तो आपल्यापासून बराच लांब आहे. १५० प्रकाशवर्षांपर्यंत पसरलेले आहे. इथेनॉल आणि मिथेनॉल सारखे अल्कोहोल शोधणे हे अद्वितीय आहे. कारण, प्रोपेनॉलचे दोन्ही प्रकार एकाच ठिकाणी शोधणे सामान्य नाही.