सातारा:
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील परिसरामध्ये सातारा शहर पोलीस वाहतूक शाखेचे गाडी आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या लोकांच्या गाडीवर कारवाई होणार की काय यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत काही नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजावरही ताशेरे उडवले आहेत त्यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयात कुठेही दुचाकी व चार चाकी वाहनतळ असल्याचे मार्गदर्शक फलक नाहीत त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या वाहनावर जर कारवाई करणार असतील तर ते आधी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध करावे मगच कारवाईस सुरुवात व्हावी असेही मत मांडण्यात आले आहे