जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने उलवे नोडमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस तर्फे भव्य दांडियाचे आयोजन.

0

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी हाती घेतल्यापासून रायगड जिल्ह्यात ते विविध सामाजिक उपक्रम राबवून कॉंग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य आणण्याचे काम करत आहेत.काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार प्रसार करत विविध सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणात राबवत आहेत.गव्हाण येथे आरोग्य शिबीर, उलवे येथे ओबीसी मेळावा, कोकण विभाग कॉंग्रेस मेळावा, क्रिकेट स्पर्धा, दहीहंडी व आता उलवे नोड येथे अतिशय सुनियोजित भव्य गरबा व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर – १८ प्लॉट नंबर – ११४, उलवे नोड येथे अतिशय नियोजन बद्ध व भव्य दांडियांचे आयोजन करण्यात आले होते.दररोज शेकडो दांडिया रसिकांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून यामध्ये सहभाग घेतला . आयोजकांतर्फे रोज आकर्षक दहा ते पंधरा बक्षिसे देण्यात येत होती.शेवटच्या दिवशी तर बंपर बक्षिसे देण्यात आली.यामध्ये LED TV, ओव्हन, होम थिएटर, मिक्सर, व इतर अशी अनेक बक्षिसे देण्यात आली. या दांडिया कार्यक्रमासाठी सामाजिक, कला, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली व अतिशय सुरेख नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.पहिल्याच वर्षी आयोजकांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.उलवे वासियांसाठी दरवर्षी असेच चांगले सामाजिक उपक्रम राबविले जातील तसेच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे लवकरच उलवे नोड वासियांना सुसज्य रुग्णवाहीका भेट देणार असल्याचे संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here