सातारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्शी बारामुरे, ता.जावली येथे विद्यार्थी संख्या कमी असल्याने केंद्र शाळा असूनही एकच शिक्षक आहे.त्यामुळे अध्ययनार्थीचे नुकसान व संरक्षणाचा अभाव आढळून येत आहे.तेव्हा शाळाच बंद करावी. अशी मागणी वंचित जिल्हा उपाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केली आहे.
केंद्र शाळा असल्यामुळे या शाळेमध्ये अनेक जुने रेकॉर्ड आहे.शाळेच्या मागच्या बाजूने कुडाळी नदी वाहते.नदीला बारामाही खळखळ वाहणारे पाणी असते. नदिवर एक मोठा पुल देखील आहे.शिवाय, शाळेच्या जवळच एक विहिरही आहे. शाळेवर फक्त एकच शिक्षक कार्यरत असल्याने ते कशाकशाचे संरक्षण करणार ?त्यांनी शिकवायचे की कार्यालयीन काम करायचे ? ऑफिशियल काम करत असताना अध्ययनार्थी एकटेच वर्गामध्ये असतात.त्यावेळेस विद्यार्थी नेमके कुठे असेल ? असे नानातर्हेचे प्रश्न पालकांस पडत असून अनर्थही घडू शकतो.काही पालकांनी तर विद्यार्थ्यांना नदीच्या पुलावरून पाण्यात डोकावतानाही पाहिलेले होते. तेव्हा शाळेमध्ये पालक मिटिंग घेवून गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना शिक्षकाच्या मागणीसाठी दोन महिन्यापूर्वी सर्व पालकांनी लेखी अर्जासह भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले आहे.त्यांनी पालकांना आश्वासनही होते.परंतू दोन महिने झाले तरी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढून टाकायचा निर्णय घेतला आहे. अशीही माहिती गायकवाड यांनी दिली आहे.