जिल्हा संयुक्त श्रमिक किसान संघटनेचा आग्रहनामा जाहीर !

0

अनिल वीर सातारा : विद्यार्थी,युवक,महिला व श्रमिक किसान यांचा विकास महाविकास आग्रहनामा जाहीर करण्यात आला आहे.  सहकारी बँकींग क्षेत्रात रोजगारासाठी सहकारी बँक परिक्षा बोर्ड निर्माण करुन बँक भरतीत भ्रष्टाचारास पायबंद घातला पाहिजे.इ.१२ वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत सार्वजनिक वाहतूक एस.टी., रेल्वे,मेट्रो प्रवास कार्ड दिले पाहिजे. सर्व महिलांना रुपये ३०००/- मासिक महालक्ष्मी योजना मोफत, एस.टी. प्रवास – सहित जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा संकल्प स्वागातार्ह आहे.महिलांचे आरोग्य व सुरक्षा धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

 घरेलू कामगार बोर्ड कार्यान्वित करुन रिटेल-सेल्समन कल्याणकारी महामंडळ गठीत करावे.श्रमिक कल्याणकारी महामंडळ भ्रष्टाचारास पायबंद घातला पाहिजे.गिरणी कामगारांची गृहनिर्माण धोरण हे मुंबईतच घर देण्याची योजनाची अंमलबजावणी केली पाहिजे. मुंबई बाहेर गिरणी कामगारांना हाकलण्याचा जी.आर, मुंबईतील १८०० एकर जमीन, १० टक्के फुकादराने भांडवलदारांच्या घशात घालणारा जी.आर. रद्द करावा. इ.पी.एस. ९५ पेन्शन मागण्यासंदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे.

अंगणवाडी,पोषणआहार, आरोग्य केंद्र,नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले पाहिजे.सर्व अंगणवाडी,आरोग्य केंद्र, नगरपालिका,ग्रामपंचायत कर्मचारी सेवकांना वेतन पेन्शन शासकीय लाभ मिळावा. शेतकऱ्यांच्या शेतमालास फळबागांसहित हमीभाव मार्केट कमिटी स्तरावर रोख लागू करावा.अशी माहिती श्रमिक संघटनेचे कॉ. विजय निकम, प्रमोद परामणे,कॉ. माणिक अवघडे, कॉ. वसंतराव नलवडे, कॉ. शाम चिंचणे, कॉ. विठ्ठल – पिसाळ, कॉ. धनराज कांबळे, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना अॅड. नदीम शौकत पठाण, जनश्रम असंघटित कामगार संघटना अस्लम तडसरकर व विक्रांत पवार यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here