सातारा/अनिल वीर : नोकरी करीत असल्यापासूनच व्ही.आर.थोरवडे यांनी धम्म कार्य निरंतर केले आहे.त्यांनी खरोखरच कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला असल्याचा संदेश अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ऍड.भीमराव आंबेडकर यांनी दिला.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवी जाहीर नागरी सत्कार येथील सुरभी मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता.तेव्हा प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई होते.अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने होते.
राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई म्हणाले, “भ.गौतम बुद्धांचा धम्म बाबासाहेब यांनी दिला. त्यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला असता तर टाटा-बिर्लाला मागे टाकले असते.सर्व प्रगतीचे प्रतीक धम्म आहे. थोरवडेसाहेबांसारखे उच्च विभूषित लोकांनी धम्म कार्य केले पाहिजे. खरोखरच, सत्वधीर भाऊंनी जिल्ह्यात धम्माची पेरणी करून त्यावर थोरवडेसाहेब यांनी कळसच चढवला आहे.त्यांनी केलेले काम समाजास आदर्शवत ठरेल.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले,”घरातील परिवार यांच्यामधील प्रतिकूल परिस्थिती असतानाही रात्र-दिन धम्मासाठी थोरवडेसाहेबांनी वेळ दिला आहे.त्यांनी धम्मासाठी उत्तुंग असे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोण्हीही गैरविश्वास दाखवू नये.जिल्ह्यात महाविहार हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साकार झालेले आहे.अजूनही पुढील काम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होईल.घर सांभाळून त्यांनी समाजसेवा केल्याने जिल्हा त्यांना कधीही विसरणार नाही.”
गेली २५ वर्षे धम्म कार्यात कार्यरत असणारे असामान्य व्यक्तिमत्व, निवृत्त असिस्टंट कमिशनर सेंट्रल एक्साइज, भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव व विद्यमान जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडेसाहेब यांच्या प्रदीर्घ धम्म कार्याविषयी व त्यांच्या समाजसेवेसाठी कृतज्ञता व्यक्त अनेकांनी केली.यामध्ये माजी राष्ट्रीय सचिव एस.एस.माने व एन.एम.आगाणे,जिल्हा कोषाध्यक्ष श्रीमंत घोरपडे,विजय गायकवाड,केंद्रीय शिक्षिका सौ. स्नेहलता विजयकुमार गायकवाड व सौ.संगीता मंगेश डावरे, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, पाटण तालुकाध्यक्ष बाळासाहेब जगताप,आप्पा अडसुळे,भानुदास सावंत आदींचा समावेश होता.
विकास तोडकर यांनी प्रास्ताविक केले.जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.ऍड.विजयानंद कांबळे यांनी आभार मानले.याकामी,जिल्हा उपाध्यक्ष बारसिंग,केंद्रीय शिक्षक भागवत भोसले,दिलीप फणसे, नंदकुमार काळे,प्रकाश तासगावकर आदी तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी अथक असे परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमास पर्यटन जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब भोळे,मिलिंदबापू कांबळे, नंदकुमार भोळे,राष्ट्रोत्सव समितीचे उपाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,ऍड.धम्मबांधव उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष विलास वहागावकर,वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे व सतीश कांबळे तसेच जिल्हा महासचिव गणेश भिसे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड(पूर्व) व विशाल भोसले(प.) तसेच महाराष्ट्र संघटक गणेश कारंडे,वंचीत संघर्ष मोर्चाचे सुधाकर काकडे व श्रीरंग वाघमारे,द्राक्षा खंडकर, श्रीमती शोभा भंडारे,सौ.कांबळे,शेलार आदि विविध क्षेत्रातील मान्यवर, महासभेचे पदाधिकारी,समता सैनिक दलातील सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, थोरवडे साहेब यांचा संपूर्ण परिवार, उपासक – उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.
फोटो : जगदीश गवई मार्गदर्शन करताना शेजारी व्ही.आर.थोरवडे व मान्यवर.(छाया-अनिल वीर)