जीवनात गुरुचे स्थान अनन्यसाधारण – एस. बी. देशमुख

0

पाताळेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी 

सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात आषाढी पौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजन करण्याचा दिवस पाताळेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सहात साजरी करण्यात आली.  जीवनात गुरुचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक एस बी देशमुख यांनी केले . या दिवसाचे विशेष महत्त्व पटवून देऊन त्यांनी आपल्या जीवनात गुरूंचा आदर अंगी बाळगून आपले जीवन संस्कारशील करावे.प्र मुख पाहुणे एम. सी. शिंगोटे सेवानिवृत्त शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना अनेक गुरूंचे  दाखले देत व आध्यात्मिक गुरूंचे महत्त्व पटविण्यासाठी पौराणिक कथा ऐकविल्या. जीवनात  संस्कार हा मौल्यवान दागिना आहे असे सांगितले.

बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात आई-वडिलांचे संस्कार अंगीकारून आपले जीवन यशस्वी बनवा. मोठे होता होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखे उत्तुंग यश प्राप्त करा. गुरु म्हणजे मार्गदर्शक गुरु म्हणजे यशस्वी जीवनाची वाटचाल म्हणूनच गुरु व्यास सारखे खूप महान बना असे सांगितले. आपल्या प्रस्ताविकेतून आपले प्रथम गुरू आई वडील व गुरुजनांचा आदर बाळगा  जीवनाच्या  वाटेवरील लहान मोठ्या गुरुजनांचा सन्मान ठेवा आर. व्ही. निकम यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गुरुपौर्णिमे बद्दल माहिती सविता देशमुख यांनी सांगितली .

 

या कार्यक्रमाप्रसंगी श्रद्धा पाटोळे, सिद्धी कडाळे, स्वराज रेवगडे, सिद्धी पाटोळे, समीक्षा बोगीर, रुही रेवगडे, प्रतिक्षा शिंदे, कार्तिक चव्हाण, ओम बिन्नर, स्वरांजली पाटोळे, साहिल चव्हाण, हर्षल जानेराव, हर्षदा पालवे, सायली रेवगडे, दर्शन* *वारुंगसे, श्याम रेवगडे, पूजा पोटे, मानसी रेवगडे, सार्थक उगले आदी विद्यार्थ्यांनी  गुरुपौर्णिमेचे महत्त्व  विशद केले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व उपशिक्षक  टी. के. रेवगडे तसेच उपशिक्षक  बी. आर. चव्हाण, एस. एम. कोटकर,* *आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सी. बी. शिंदे, के. डी, गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here