जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबीराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

0

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे) : भारत देशाचे नेते, मा.कृषीमंत्री ,फुले शाहु आंबेडकर यांचा वारसा जपनारे व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या त्यांना मंगलमय शुभैच्छा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष )तर्फे उलवे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 शरद पवार यांच्या वाढदिवसानीम्मित निल सागर अपार्टमेंट ,प्लॉट नंबर २०६, सेक्टर ८ उलवे नोड (नवी मुंबई) या ठिकाणी रुद्राक्षी क्लिनिक व पंचकर्म सेंटर आणि तेरणा हॉस्पिटल नेरुळ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला व खुप चांगल्या टेस्ट घेवुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य करण्यात आले.

सदर या कार्यक्रमास या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक संतोषभाई घरत ( प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य , राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ),डॉ.शालिनीताई वारद ( NCP डॉ.सेल सरचिटणीस नवी मुंबई ) त्याचप्रमाणे डॉ.प्रकाश नेवाळ, रायगड जिल्हा सरचिटणीस करण भोईर ,उलवे नोड संयोजक ॲड.राज पाटील , इत्यादी पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.एकंदरीत शरद पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here